बारी दाम्पत्याचा कन्यारत्न प्राप्तीनिमित्त सत्कार

WhatsApp Image 2019 07 12 at 10.10.09 AM

जळगाव । प्रतिनिधी । समस्त बारी पंच मंडळ जळगाव व बारी युवा प्रकोष्ठ जळगावतर्फे जळगावमधील बारी समाजातील कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यास मुलीचा व तिच्या आई- वडिलांचा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले होते. यानुसार श्रीधर नगरमध्ये आज पहिला सत्कार सागर एकनाथ बारी व त्यांची पत्नी, मुलीचा करण्याता आला.

 

समस्त बारी पंच मंडळ व बारी युवा प्रकोष्ठ यांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सागर एकनाथ बारी यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने त्यांचा व त्यांची पत्नी पूनम,  मुलगी स्वरा व कुटुंबासहित लहान स्वराला ड्रेस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समस्त बारी पंच मंडळ जळगावचे अध्यक्ष लतीश बारी, उपाध्यक्ष विजय बारी प्रसिद्धी प्रमुख नितीन बारी, युवा प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष सुनील बारी, शहराध्यक्ष मनोज बारी,शहर उपाध्यक्ष अरुण बारी, नियोजन समिती अध्यक्ष महेंद्र बारी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content