प्रसुती दरम्यान अति रक्तस्त्रावाने महिलेचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी )– घरी प्रसूत झालेल्या एका विवाहितेला अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरू असताना तीचा मृत्यू झाला. शनिवारी पहाटे चार वाजता तीची प्रसूती झाली होती. तर दुपारी १२.१५ वाजता रुग्णालयाता मृत्यू झाला.

शादीबाई रितेश बारेला (वय २६, रा.कृष्णापुर, ता.चोपडा) असे मृत विवहितेचे नाव आहे. शादीबाई ह्या गर्भवतील असल्याने त्यांनी शनिवारी पहाटे चार वाजता राहत्या घरीच प्रसूती झाली. त्यांनी एका मुलीस जन्म दिला होता. प्रसूतीनंतर त्यांना अतिरक्तस्त्राव झाला. प्रकृती खराब झाल्यामुळे कुटुंबियांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दुपारी १२.१५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. शादीबाई हिला या आधी दोन वर्षांचा मुलगा आहे. तर तिने शनिवारी जन्म दिलेल्या मुलीची प्रकृती देखील चांगली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शुन्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content