Home Cities जळगाव फेसबुकवरील लाईव्ह कार्यक्रमातून किशोर कुमार यांना अभिवादन

फेसबुकवरील लाईव्ह कार्यक्रमातून किशोर कुमार यांना अभिवादन

0
33


जळगाव प्रतिनिधी । येथील ऑर्केस्ट्रा सुनहरे पलतर्फे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करून महान गायक किशोर कुमार यांना अभिवादन करण्यात आले.

र्केस्ट्रा सुनहरे पल यांच्यावतीने सुप्रसिद्ध गायक व अभिनेता किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. किशोरकुमार यांनी गायलेल्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम फेकबुक लाईव्हद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेकांनी मेहनत घेतली. सुनहरे पलचे संचालक दीपक नाटेकर यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले. गायक कलाकार लक्ष्मी नाटेकर, प्रभाकर जाधव, गोपाल गोस्वामी , दिनेश गोयर व सतीश बाटूंगे यांनी या कार्यक्रमात एक से बढकर एक ..अशी गाणी सादर केली.

सूत्रसंचालन प्रकाश लोढते यांनी केले. कार्यक्रमासाठी पुरुषोत्तम जाधव ,धनराज रावळकर यांनीही सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी एक विनंती करण्यात आली असून आम्हा कलाकाराबद्दल सरकारने विचार करावा व कलाकारांसाठी काही मदत उपलब्ध करून द्यावी ,अशी कळकळीची विनंती सर्वच कलावंतांनी केली.अनेक श्रोत्यांनी या अभिनव उपक्रमास प्रतिसाद दिला.


Protected Content

Play sound