बांभोरी प्रचा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बांभोरी प्रचा ग्रामपंचायत व जि.प.शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरीकरण्यात आली.

 

सरपंच सचिन बिऱ्हाडे यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजकार्य विभागाच्या कार्यकर्त्यांनी जि. प.शाळेत मुलांना चित्रकला स्पर्धा  राबवून महात्मा गांधींना अनोखे असे अभिवादन करण्यात आले.     याप्रसंगी सरपंच सचिन बिऱ्हाडे यांनी महात्मा गांधीजींचे सत्य व अहिंसा या विचारांची आज माणसाला गरज असल्याचे मार्गदर्शनातून सांगितले. तसेच कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव मधील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी जि.प.शाळेतील शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण नन्नवरे, गणेश नन्नवरे, अनिल नन्नवरे व समाजकार्य विभागचे सामाजिक कार्यकर्ते माधव पाटील, प्रवीण शिंदे, हिरामण गावित, हृतिक महाले, प्रेम वाकडे, कविता पालवे, ललिता आढारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Protected Content