चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील जाकीर हुसेन सोसायटीत एका तरूणाला शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवार १७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. यापकरणी गुरूवार २० एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील चौधरी वाडा परिसरात हुजेफा खान अब्दुल रहेमान वय २३ हा तरूण वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा नावेद शेख मुशीर शेख हा नेहमी दारू पिऊन शिवीगाळ करत असतो. याबाबत हुजेफा खान याने नावेद शेख यांच्या वडीलांना हा प्रकार सांगितला. याचा राग आल्याने नावेद शेख याने हुजेफा खान याला अश्लिल शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या हुजेफा याला चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुभाष पाटील हे करीत आहे.