मतदान केंद्रावर नियुक्त आदेश रद्द करण्यासाठी ७३२ जणांचे अर्ज; ४२१ जणांचे अर्ज मान्य

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदान बूथवर नेमणूक केलेल्या जामनेर, चाळीसगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण ७३२ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून विविध अपरिहार्य कारणासाठी नेमणूक रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. त्या कारणाची पडताळणीत करून ४२१ जणांची नेमणूक रद्द करण्यात आली तर ३११ जणांच्या विनंती अमान्य करण्यात आल्या आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाभरातील शासकीय कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. यापैकी जामनेर, चाळीसगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण ७३२ कर्मचाऱ्यांचे विविध गंभीर कारणास्तव निवडणूक ड्युटी रद्द करणे बाबतचे विनंती अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ४२१ कर्मचाऱ्यांचे निवडणूक ड्युटी आदेश पडताळणी केल्यानंतर रद्द करण्यात आले आहेत. तर ३११ अर्ज प्रस्तावित करण्यात आलेले नाहीत. निवडणूक ड्युटी आदेश रद्द केलेल्या ४२१ जणांमध्ये प्लॅनिंग आणि रिपोर्टिंग ऑफिसर ( पीआरओ ) ८८ , प्रथम निवडणूक अधिकारी ७७ ( एफपीओ ) आणि २५२ ओपीओ आणि ४ मतदान कर्मचारी यांचा समावेश आहे.

Protected Content