नाशिक-दिंडोरी मार्गावर कारचा भीषण अपघात; ५ जण ठार व ३ जण जखमी

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गत काही दिवसांपासून नाशिक जिल्हा व परिसरात अपघातांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. नाशिक-दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीच्या धडकेत ५ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले. मृतांत द्राक्ष व्यापारी रामकेश यादव, मुकेश यादव यांचा समावेश आहे.

बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. कारचे टायर फुटल्यामुळे हा अपघात घडला. टायर फुटल्यानंतर कार प्रथम दुचाकीला धडकली आणि त्यानंतर रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. या अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले. अपघातग्रस्त कारमधील नागरीक बोलेरो जीपमधील व्यक्ती हे सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतत होते पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाचा घाला घातला. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 

Protected Content