जुन्या वादातून तरूणाला जीवघेणा हल्ला !

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील कॉटन मार्केटजवळ जुन्या वादातून एका तरुणाला लोखंडी रॉड आणि धारदार शासनाने वार करून गंभीर दुखापत करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडला आहे. या संदर्भात मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल दशरथ चौधरी वय-28 रा.भोईवाडा अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सुमारे ४ ते ५ वर्षांपूर्वी डी.जे.वर नाचण्याच्या कारणावरून सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता त्याच परिसरात राहणारे विजय सुरेश शिंगाणे, प्रितम हिरालाल शिंगाणे, दीपक हिरालाल शिंगाणे, दीपक शांताराम ढाके, गणेश बापू शिंगाणे, दिनेश गैबू शिंगाणे सर्व रा. भोईवाडा, अमळनेर या ६ जणांनी कॉटन मार्केट येथे लोखंडी रॉड, धारदार हत्यार आणि चाकू घेऊन विशाल चौधरी याच्यावर वार केले. तसेच त्याला दमदाटी करून जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान या घटनेबाबत विशाल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे विजय शिंगाणे, प्रीतम शिंगाणे, दीपक शिंगाणे, दीपक ढाके, गणेश शिंगाणे आणि दिनेश शिंगाणे या ६ जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल हे करीत आहे.

Protected Content