रीवा-वृत्तसेवा | मध्यप्रदेशात रात्री उशीरा बसच्या अपघातात १४ प्रवासी ठार झाले असून २० पेक्षा जास्त गंभीर जखमी झाले आहेत.
मध्यप्रदेशातील रीवा शहराच्या जवळ काल रात्री अकराच्या सुमारास बसचा भीषण अपघात झाला. हा भाग मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशच्या सीमेवर असून येथून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. बसमधील सर्व प्रवासी कामगार होते. दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या घरी जात होती. मात्र त्यांच्यावर काळाने आधीच घाला घातला.
हा अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याबाबत अद्याप ठोस माहिती मिळाली नाही. तथापि, बस आणि ट्रेलरमध्ये धडक झाल्याने हा अपघात घडल्याचे समजते. तसेच गाडीत नेमके किती प्रवासी होते, ते कुठले निवासी होते त्यांची नावे या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, या अपघातात १४ प्रवासी ठार झाले असून २० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.