एरंडोल (प्रतिनिधी) दि. ७ जूनला मृग नक्षत्र सुरु होऊन जवळपास एक आठवडा उलटला तरी सुद्धा एरंडोल तालुक्यात पावसाचे आगमन झालेले नाहीय. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
गेल्या वर्षभरात दुष्काळ व टंचाईचे चटके सोसून त्रस्त झालेले शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रोज ढगाळ व पावसाळी वातावरण तयार झालेले दिसून येते.परंतू पावसाच्या सरीचे आगमन होत नाहीय. एरंडोल तालुक्यात रोज आकाशात ढग जमलेले दिसतात. वाराही वाहताना दिसतो. आता पाऊस होईल असे चित्र तयार होते. पण पाऊस होत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यात वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होते. म्हणून ‘येरे येरे पावसा……’ अशी आराधना शेतकरी व नागरिक करू लागले आहेत.