भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील शेतकरी संघाच्या निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत शेतकरी विकास पॅनलला बहुमत मिळाले.
भडगाव शेतकरी सहकारी संघ या संस्थेच्या सन २०२३ ते २०२८ साठी पंचवार्षीक निवडणुक दि. २१ मे रोजी मतदान झाले. आज २२ रोजी मतमोजणी झाली. संस्थेच्या एकुण १५ जागांसाठी ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामधे शेतकरी विकास पॅनलचे १२ उमेदवारी विजयी झालेत. तर सहकार विकास पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
भडगाव शेतकरी संघाच्या १५ जागांमध्ये ६ जागा विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघ, ४ जागा व्यक्तिशः मतदार संघ, १ जागा अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ, १ जागा इतर मागासवर्गीय मतदार संघ, १ जागा वी.जा.म.ज. मतदार संघ, २ जागा महिला राखीव अशा जागा आहेत.
या निवडणुकीत १५ जागांसाठी एकुण ३० उमेदवार रिंगणात होते. यामधे विजयी उमेदवार सर्वसाधारण संस्था मतदार संघात प्रताप हरी पाटील; गुमानसिंग हिलाल पाटील; प्रभाकर शामराव पाटील, जयवंत विक्रम पाटिू, देविदास सहादु माळी व राजेंद्र लालचंद परदेशी हे निवडून आलेत.
सर्वसाधारण व्यक्तिशःमतदासंघांत भैय्यासाहेब पुडलिंक पाटिल; अमोल नाना पाटील, अमोल सुरेश पाटील, जयवंत किसन पाटिल (जे. के), महिला राखीव मतदासंघ सौ. योजना दत्तात्रय पाटील व शुभांगी तुषार भोसले (पाटिल), तसेच इतर मागास प्रवर्ग गुलाब हिलाल पाटिल, अनुसूचित जाती जमाती मतदासंघ हिरामण सुखदेव पाटोळे, विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग यामधे रायचंद शामसिंग परदेशी हे उमेदवार विजयी झाले आहेत.