अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सन २०२१ मधील खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्या मुळे ३३ टक्केवारीच्या वर पिकांचे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अदयाप शासकिय मदत मिळाली नाही.
यासाठी अमळनेर प्रांत कार्यालयासमोर अमळनेर येथे १८ जानेवारी पासून साखळी उपोषणास बसत असल्याबाबतचा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. हे साखळी उपोषण दि. १८-०१-२०२४ पासुन दररोज सकाळी ११ वाजेपासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत असेल, याकरिता तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधवांनी उपस्थिती द्यावी असे देखील आवाहन करण्यात आले आहे.