जय संघर्ष चालक-मालक संघटनेतर्फे हिट अँड रन कायदयाविरोधात स्टेंरिग छोडो आंदोलन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ येथे केंद्र सरकारने गेल्या अधिवेशनामध्ये हिट अँड रन हा कायदा पास केला या कायद्यानुसार एखाद्या वाहन चालकाने रस्त्यावर अपघात केला, त्यात कुणाचा जीव गेला असेल व चालक तिथून पोलिसांना कल्पना न देता पसार झाला असेल तर त्या चालकाला सात लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा असा कठोर कायदा करण्यात आलेला आहे.

वास्तविक अपघात हा अपघात असतो कोणीही जाणून-बुजून तसे करत नाही, मात्र अपघात झाल्यानंतर संतप्त जमाव त्या वाहनाची नासदोष करून चालकाचा खून देखील प्रसंगी करतो. म्हणून चालकाला तिथून प्रसार व्हावे लागते. शासनाने हा कायदा तात्काळ रद्द करावा यासाठी भुसावळ येथील जय संघर्ष या चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाटा चौफुली ते वर येऊन आंदोलन करत शासनाचा निषेध केला व कायदा रद्दची मागणी केली आज स्टेरिंग छोडो आंदोलन केले आहे. पुढच्या टप्प्यात सर्व प्रकारचे वाहन आहेत. त्याच जागेवर थांबतील असा इशारा देखील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देऊन शासनाकडे हा कायदा रद्द करावा अशी मागणी केली आहे

Protected Content