शंभू सीमेवरील शेतकरी आंदोलनाला आले हिसंक वळण

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हरयाणा पोलिसांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे मोर्चा काढण्यावर ठाम असलेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शंभू सीमेवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. दिल्लीकडे निघालेल्या १०१ शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर अश्रुधुराचा वापर केला. यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले. याशिवाय पोलिसांनी शेतकऱ्यांवर वॉटर कॅननचा मारा देखील केला. यापूर्वी ६ आणि ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हरियाणा पोलिसांनी त्यांना सीमेवरच रोखले. पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा वापर केला. या झटापटीत अनेक शेतकरी जखमी झाले होते.

शेतकऱ्यांनी शनिवारी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमेजवळ बॅरिकेड्स लावून हरियाणा पोलिसांनि आंदोलक शेतकऱ्यांना मध्येच रोखले. यावेळी आंदोलन चिघळून त्याला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली तर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. यात काही आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, शेतकरी नेते आणि प्रशासन यांच्यात संवाद झाला. शेतकरी नेत्यांनी सांगितले की ते देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी त्यांना राजधानीत दिल्लीत जायचे आहे. शांततेच्या मार्गाने पंतप्रधानांसमोर आपल्या समस्या व प्रश्न मांडून त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या झटापटीत काही शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांना दावखण्यात भरती करण्यात आले आहे. एमएसपीसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी बऱ्याच दिवसांपासून दिल्लीत आंदोलंन करण्यावर ठाम आहेत. त्याचवेळी मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले जात नाही. अशा तऱ्हेने शेतकरी फेब्रुवारीपासून शंभू सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. आज १०१ शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस दल आणि प्रसारमाध्यमांचे कर्मचारी उपस्थित आहेत. हरयाणा पोलीस शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी वॉटर कॅननचा वापर करत आहेत. त्याचवेळी आंदोलक शेतकरी मागे हटायला तयार नाहीत.

Protected Content