विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू ; लासगाव येथील घटना

पाचोरा प्रतिनिधी । पत्नीस पाण्याची तहाण लागल्याने शेतकरी विहिरीत पाणी काढण्यासाठी गेला असता पाय घसरुन विहिरीत पडल्याने मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील लासगाव येथे उघडकीस आली आहे.

दरम्यान शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे व विहीर कच्ची असल्याने इसमाचा पाय घसरून विहीरीत पडला. विहीरीत २० ते २५ फुट पाणी असल्याने त्याचा मृत्यू झाला. विहीर ही भेंडीच्या शेतापासुन जवळच असल्याने त्याचे पत्नीस विहीरीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने तिचा पती पडल्याचे निदर्शनास आले. पत्नीने गावातील नागरिकांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती कळविली. मात्र गावातील नागरिक घटनास्थळी पोहचे पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. कैलास सखाराम महाजन असे मयत इसमाचे नाव असुन त्यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. त्यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडील, पत्नी व तीन मुली आहेत.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामदास चौधरी हे करत आहे.

 

Protected Content