श्री.गो.से.हायस्कुल येथे निरोप व स्वागत समारंभ संपन्न

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा आणि नवनियुक्त मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांचा सत्कार संपन्न झाला.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर पाटील हे आज रविवार, दि. ३१ जुलै रोजी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांचा सेवापूर्ती सोहळा आज विद्यालयात संपन्न झाला.

माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या हस्ते सुधीर पाटील यांचा कर्तव्यपूर्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाच्या नवनियुक्त मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांचा सत्कार तांत्रिक विभागाचे शालेय समिती चेअरमन वासुदेव महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी हे अध्यक्ष स्थानी होते. संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मानद सचिव अॅड. महेश देशमुख तसेच संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुरेश देवरे, दगाजी वाघ, मधुकर पाटील, अर्जुनदास पंजाबी, प्रकाश पाटील, भागचंद राका, सिताराम पाटील उपस्थित होते.

या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, ए. बी. अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, कार्यालय अधीक्षक अजय सिनकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे, एस. जे. मणियार यांनी मनोगत व्यक्त केले.

मुख्याध्यापक पदाची यशस्वी कारकीर्द संस्थाचालक यांचे मार्गदर्शन व स्टाफचे सहकार्य यामुळे शक्य झाली. असे सुधीर पाटील यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमिला वाघ यांनी तर सूत्रसंचालन आर. बी. बोरसे यांनी केले उपस्थितांचे आभार आर. बी. तडवी यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.