जळगाव प्रतिनिधी । जैने इरिगेशन व अॅक्शन प्लॅटफॉर्मच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी क्षेत्रातील भविष्यदर्शी नायकांच्या फाली-२०१९ संमेलनाच्या पहिल्या सत्राचा समारोप आज झाला.
फाली-२०१९ संमेलनासाठी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील एकूण १०० शाळांच्या ८००० विद्यार्थ्यांपैकी ८०० विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. यापैकी प्रथम गटाच्या विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले. जैन हिल्स आवारातील आकाश मैदानावर झालेल्या संमेलनाच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, क्शनप्लॅटफार्मच्या समन्वयिका नॅन्सी बेरी, जैन फार्मफ्रेश फूडसचे संचालक अथांग जैन, कार्यकारी संचालक सुनील देशपांडे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. अनिल ढाके, गोदरेज एग्रोवेटचे प्रमोद प्रसाद, अंकुर वेरमाणी, युपीएलचे समीर म्हैसकर, वैभव गुंढे, नथा दुडीया, जतीन पटेल, बायर क्रॉप सायन्सचे जिंतेंद्र गावंडे, फाल्गुन शहा,स्टार ग्रीचे हरिष रावत, अभिषेक प्रधान, विपीन सिंघल उपस्थित होते. पहिल्या टप्प्याच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. अशोक जैन यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत म्हटले की, फालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी बिझनेस प्लॅन आणि इनोव्हेशेन स्पर्धेत सादरीकरण केले. हे सादरीकरण कृषी क्षेत्रात येणार्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रभावी माध्यमच म्हणावे लागेल. असे सांगितले. तसेच भवरलाल जैन यांनी लहानश्या रकमेतून उभारलेल्या उद्योगाच्या विस्ताराची कहाणी विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी उदाहरणासह दिली. फालीचे व्यवस्थापक हर्ष नौटियाल यांनी सूत्रसंचालन केले. रोहीणी घाडगे, सचिन पवार, प्रदीप गरकड यांनी सहकार्य केले.
फाली-२०१९ अंतर्गत घेतलेल्या पहिल्या टप्प्याच्या इनोव्हेशन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात बहुउद्देशीय शेती यंत्र, ऊस लागवड यंत्र, नारळ फोडण्याचे यंत्र, कीड नियंत्रणासाठी चिकट सापळा यंत्र, लाईट असलेले फिरते सापळा यंत्र, यासह अनेक इनोव्हेटिव्ह उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री शिवाजी मल्टीर्पपज उच्च माध्यमिक स्कूल (अमरावती), द्वितीय क्रमांक खान्देश गांधी बालूभाई मेहता विद्यालय (कासरे), तृतीय क्रमांक स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूल (कालीमठ), चतुर्थ क्रमांक पिंपळगाव हायस्कूल (नाशिक), तर पाचवा क्रमांक राधाबाई शिंदे हायस्कूल (हस्ता).