जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे विभागाचे अधिकारी श्रीमती इती पांडेय यांचा फोटोचा गैरवापर करून व्हॉटसॲप खात्यावर डीपी ठेवून मध्य रेल्वे अधिकारी यांचे असल्याचे भासवित असल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी ४ जुलै रोजी समोर आला आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता अज्ञात मोबाईलधारकावर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ रेल्वे अधिकारी श्रीमती इती पांडेय यांच्या फोटोचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने मोबाईल क्रमांकाचे व्हॉटसॲप खाते तयार केले. त्यावेळी इती पांडेय यांच्या फोटो डीपीवर ठेवून मध्यरेल्वे अधिकारी असल्याचे भासवत होता. ही प्रकार गुरूवार ४ जूलै रोजी समोर आला. दरम्याने भुसावळ रेल्वे सुरक्षा बल विभागाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त अशोक कुमार यांनी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी ४ जुलै रोजी रात्री ८ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात बनावट व्हॉटसॲप खाते तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.