मध्य प्रदेश : कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराच्या मुलीची आत्महत्या

भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार सुरेश धाकड यांची मुलगी ज्योती हिने राजस्थानमधील आपल्या सासुरवाडीत गळफास आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड पुकारत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर शिंदे समर्थक आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला असून २२ आमदारांना बंगळुरुमध्ये ठेवण्यात आले आहे. शिदे समर्थक आमदार सुरेश धाकड यांची मुलगी ज्योती हिने राजस्थानमधील आपल्या सासुरवाडीला गळफास लावून आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येचे वृत्त समजताच धाकड हे चार्टर्ड विमानाने राजस्थानला निघाले आहेत. दरम्यान, धाकड यांचा राजीनामा मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांसह काल रात्रीच मंजूर केला आहे.

Protected Content