निर्भया : कुटुंबीयांनी मृतदेह न स्वीकारल्यास कारागृहातच होणार अंत्यसंस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निर्भया प्रकरणातील चौघा दोषींचे शवविच्छेदनानंतर मृतदेह घरच्या मंडळींकडे अंतिम संस्कारासाठी देण्यात येतील. जर कुटुंबिय मृतदेह घेण्यासाठी आले नाही तर चारही गुन्हेगारांच्या मृतदेहावर कारागृहातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात न घेतल्यास सरकार अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती तिहार तुरूंगाचे डीजींनी दिली आहे. रात्रीच्या वेळी मुकेश आणि विनयने जेवण घेतले. तर अक्षयने केवळ चहा घेतला. ते चौघही जण शांत होते. तसेच न्यायालयाकडून काही आदेश आले आहेत का? याची माहिती घेत होते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कुटुंबिय मृतदेह घेण्यासाठी आले नाही तर चारही गुन्हेगारांच्या मृतदेहावर ज्या जेल क्रमांक ३ मध्ये ही फाशी देण्यात आली त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Protected Content