फैजपूरच्या ऐतिहासिक शाळेला घाणीचा विळखा ( व्हिडीओ )

faizpur marathi school

फैजपुर प्रतिनिधी । येथील ऐतिहासिक म्युनिसिपल हायस्कूल व जि. प. संचलित मराठी शाळा क्रमांक एकला लागून असलेल्या पटांगणाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आज महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केलेल्या पाहणीतून येथील भीषण स्थिती समोर आली आहे.

येथील मराठी शाळेच्या पटांगणाची पाहणी आज महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज यांनी पाहणी केली. यावेळी शालेय समिती सभापती शेख कुर्बान, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, आरोग्य निरीक्षक विपुल साळुंके व मुख्याध्यापक आर.एल.आगळे यांनी पाहणी केली. या पाहणीत एक धक्कादायक चित्र पाहवयास मिळाले. म्युनिसिपल हास्कुलच्या पाठीमागच्या मैदानात तेथील रहिवाशांनी घरातील सर्व कचरा त्या शाळेच्या मैदानात टाकलेला असतो. त्यातच मराठी मुलांची शाळा न १ या मध्ये विद्यार्थी शिकत असलेल्या ठिकाणी लागून असलेल्या स्वच्छालयाचे पाईप व मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व गटारी तुडूंब भरल्या असून या मुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना त्यांच्या आरोग्याचा जीवाशी खेळ सुरू आहे. तसेच मराठी मुलांच्या शाळेत स्लॅबला गळती लागली आहे व पाऊस सुरू असल्यास संपुर्ण स्लॅब ला गळती सुरू असते त्यामुळे शिक्षक ही शिकवायचे कसे हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या मुळे जीव मुठीत धरून शिक्षक व विद्यार्थ्यांना शिक्षण घेत आहे.

दरम्यान, आज झालेल्या पाहणी दरम्यान शिक्षकांनी सर्व पाहणी करून आरोग्यासाठी काहीतरी पाऊले उचलून स्लॅब दुरुस्ती साठी गेल्या तीन वर्षांपासून जि. प. शिक्षण विभागाकडे पत्र व्यवहार केला आहे. मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभाग झोपेचे सोंग घेत आहे की, काही अनुचित घटना घडावी याची वाट पाहत आहे ? आतापर्यंत जिल्हा परिषदे कडून अजून कोणतेही प्रतिसाद न मिळाल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

पोषण आहार शिजतो घाणीच्या साम्राज्यात

सरकारने पहिले ते आठवी पर्यंत मोफत शालेय पोषण आहार सुरु केला आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या टिकावी व विद्यार्थी शारिरीक तंदुरुस्त रहावे म्हणून शालेय पोषण आहार सुरु करण्यात आला आहे. मात्र आज शाळेची पाहणी केली असता चक्क विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार हा घाणीच्या साम्राज्यात शिजत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या मुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसले. ज्या ठिकाणी पोषण आहार शिजवला जातो त्या जागेच्या १० फूट अंतरावर नागरिकांनी घरातील शैचालयाचे पाईप गटारींमध्ये सोडले आहे. या मुळे विद्यार्थ्यांना दिवसभर वास सहन करावा लागत आहे आणि शालेय पोषण आहार शिजत आहे एकंदरीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे? याला कोण जबाबदार राहणार ? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गटारी नसल्याने नागरिकांनी टाकला पाईप

दरम्यान, ज्या नागरिकांनी शाळेच्या मैदान सांडपाण्याचे पाईप सोडले त्यांनी आज नगरपालिकेचे गर्‍हाणे मांडले तेथील नागरिकांनी सांगितले की पालिकेला वेळोवेळी गटार बांधून द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असून आम्हाला पर्याय नाही पण विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षता घेता आम्ही पाईप कडण्यास तयार आहे पण आम्हाला पालिकेने गटारीचे व्यवस्था करून द्यावी अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे. या संदर्भात मुख्याधिकारी किशोर चव्हाण म्हणाले की, पालिका शाळेच्या मैदानावर ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना तात्काळ नोटिसा देण्यात येतील तसे जे नागरिक घरातील कचरा शाळेच्या मैदानावर टाकत आहे किंवा ज्यांनी सांडपाण्याचे पाईप सोडले आहे अशा सर्वांना नोटिसा तात्काळ नोटिसा देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी बंद गटार आहे ती मोकळी करण्याचे आदेश दिले आहे जेणेकरून नागरिकांना त्या गटारीचा वापर करता येईल.

पहा : पाहणीतील भीषण स्थितीचे वास्तव दर्शविणारा व्हिडीओ.

Protected Content