पाऊले चालती पंढरीची वाट (व्हिडीओ)

pantharpur vari

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील युवा उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने आज (दि.1 जूलै) रोजी हजारो वारकरी शहरातून जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी, बोला पंढरीनाथ महाराज की जय, असा विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

 

याबाबत माहिती अशी की, या शोभायात्रेने संपूर्ण शहर विठ्ठलमय झाले असून, या वारीच्या प्रस्थान आधी शहरातील राजपूत मंगल कार्यालय जवळ सिताराम पैलवान यांच्या पटांगणावर सकाळी सात वाजता हरिपाठाने करण्यात आले. या हरिपाठानंतर ही वारी पंढरपूरकडे रवाना झालीय. यावेळी भडगाव स्टेशन रोड, घाट रोड मार्ग काँग्रेस वाडी येथील हनुमान मंदिराजवळ या गाड्यांच्या ताफ्याला झेंडा दाखवून पुढे पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. यावेळी मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, माझे आई-वडील पंढरीच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त असून, त्यांच्या खांद्यावर मी 10 वर्ष वारी केली असून, आता तालुक्यातील 2000 वारकऱ्यांसोबत ही वारी करताना अत्यंत आनंद होत आहे. पंढरपूर येथे विठोबाचे दर्शन घेताना माझ्या तालुक्यातील ‘बळीराजाला सुखी कर, चांगला पाऊस होऊ दे’ व ‘अन्नधान्य चांगलं पिकू दे, रोजगाराला रोजगार मिळू दे’ तहानलेल्याला पाणी मिळू दे, भुकेलेला अन्न मिळू दे, आणि आमचा तालुका सुजलाम सुफलाम’ रहावा असे साकडे विठ्ठलाला घालणार असल्याचे भावनिक उदगार चव्हाण यांनी काढले आहे.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, नगरपालिकेच्या अध्यक्ष अशालता चव्हाण, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, महिला आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, शेषराव पाटील, नगरसेविका संगीता गवळी, विजया पवार, प्रतिभा चव्हाण, बाजार समिती सभापती रवींद्र पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, सचिव एम.बी.पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष शुभम चव्हाण, अजय जोशी, शरद पाटील, रवींद्र सूर्यवंशी, भाजपाचे भुषण पाटील, अमित सुराणा, योगेश खंडेलवाल व शांताराम चौधरी आदी उपस्थित होते.

 

Protected Content