असोद्यात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

a39ecaa1 49e6 4b02 84e9 0d8aec8fc6f1

 

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील असोदा येथील मुकेश सपकाळे या तरुणाचा शनिवारी एम.जे.महाविद्यालयात खून झाला होता. असोदेकर मुकेशच्या दु:खातून सावरत तोच आज एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे गावावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, असोद्यात राहणाऱ्या धनश्री संजय सपकाळे (वय १९) हिने आज दुपारी ५:३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. परिवारातील सदस्यांचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ धनश्रीला जिल्हा रुग्णालयात नेले. परंतू डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, धनश्रीच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा जिल्हा रुग्णालयात असोदा येथील नागरिकांनी गर्दी केली होती. तर धनश्रीच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरु होता.

Protected Content