फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । शहरातील यावल रोडवर असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून चोरून नेण्याचा प्रयत्न शनिवारी सकाळी उघडकीला आला होता. याप्रकरणी रात्री उशीरा फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, फैजपूर शहरातील फैजपूर येथील दूध शीतकरण केंद्राच्या समोर यावल रोडवर स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम लावण्यात आलेले आहे. शनिवारी २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास एटीएम मधून धुर निघत असल्याचे काहिंना दिसून आला होत. याबाबत नागरीकांनी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती कळविण्यात आली होती. यानंतर फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएमला कापण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. अर्धवट कापून त्यांनी पळ काढल्याचे समोर आले. यावेळी सुमारे २ लाख ३१ हजार रूपयांचे नुकसान केले. याप्रकरणी शनिवारी रात्री ११ वाजता एटीएफ ऑफीस आदेश विजय अहिरे (वय-२७) रा. जेलरोड नाशिक यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे.