फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नूतन वर्षाच्या दिनदर्शीकेचे प्रकाशन संत मंडळींसह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
फैजपूर माजी नगराध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व भाजपा नेते निलेश राणे यांनी सालाबादाप्रमाणे या वर्षीही दिनदर्शीका तयार केली आहे. त्यांच्या संकल्पेनेतून तयार झालेल्या नवीन वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा फैजपूर येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय या अध्यात्मिक संस्थेच्या आवारात पार पडला.
या वेळी सतपंथ रत्न महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, खंडेराव संस्थान चे गादीपती १००८ महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या शकुंतला दिदी व मीरा दिदी यांच्या शुभ हस्ते २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी हनुमान जन्मोत्सवाचे अध्यक्ष वैभव वकारे, बांधकाम व्यावसायिक ललित चौधरी, मनोज चौधरी, कुंदन चौधरी, करणी सेना अध्यक्ष अक्षयसिंह परदेशी, पवन परदेशी, सचिन चौधरी, योगेश साळी यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.