सज्ञान महिलेस इच्छेनुसार विवाह व धर्मांतर करण्याचा अधिकार-हायकोर्ट

कोलकाता वृत्तसंस्था । कोणत्याही सज्ञान महिलेस आपल्या इच्छेनुसार विवाह करण्याचा आणि धर्मांतर करण्याचा अधिकार असल्याचा निर्णय कोलकाता हायकोर्टाने दिला आहे.

पल्लबी सरकार (वय १९) ही तरुणी १५ सप्टेंबर २०२० पासून बेपत्ता असल्याची याचिका तिच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केली होती. दरम्यान, ७ डिसेंबर २०२० रोजी मुर्तिया पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, पल्लबीने असमौल शेख नामक मुस्लिम तरुणाशी विवाह केला असून तिने इस्लाम धर्मही स्विकारला असल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी संबंधीत तरुणीचा जबाबही नोंदवला असून यामध्ये तिने आपल्यावर लग्न करण्यासाठी आणि धर्म परिवर्तनासाठी कुठलीही सक्ती केली नसल्याचं तिनं म्हटलं असून वडिलांच्या घरी परतण्याची इच्छा नसल्याचंही तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे. यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले असतांना सज्ञान महिला ही इच्छेनुसार विवाह आणि धर्मांतर करू शकते असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

Protected Content