फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तब्बल ५७ कोटी रूपयांचे कर्ज थकविल्याच्या कारणावरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मधुकर सहकारी साखर कारखाना ( मसाका ) ताब्यात घेतला आहे.
मधुकर सहकारी साखर कारखाना हा वाढीव कर्जाच्या बोज्यामुळे दोन वर्षांपासून बंद होता. हा कारखाना सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करून देखील याला यश लाभले नाही. गेल्या महिन्यातच जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी मधुकर सहकारी साखर कारखाना आणि वसंत सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याचे सूतोवाच केले होते. यानुसार बँक सिक्युरटायझेशन कायद्याच्या अंतर्गत जेडीसीसीने या कारखान्याचा ताबा घेतला आहे.
जळगाव जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी महाव्यवस्थापक एम.टी.चौधरी यांच्यासह प्रमुख अधिकार्यांनी सोमवारी कारखान्यात जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत कारखान्याचा ताबा घेतला
जिल्हा बँकेचे कारखान्याकडून ५७ कोटी घ्यावयाचे होते. ते सात दिवसात जमा करण्यासाठी नोटीस पाठवली. ती १६ रोजी संपल्याने २५ रोजी कारखान्याच्या मालमत्तेचा जिल्हा बँकेने घेतला आहे. यामुळे जवळपास चार दशकांपर्यंत गाळप केलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य नेमके काय असेल ? याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्मित झाले आहे.