फैजपूर डिवायएसपी नरेंद्र पिंगळे यांचा सेवानिवृत्तीपर गौरव

रावेर प्रतिनिधी । फैजपूर विभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे हे आज पोलिस सेवेतून निवृत्त होत आहेत. तथापि, आज जळगाव येथे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सन्मान करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

फैजपुरचे डिवायएसपी नरेंद्र पिंगळे वयाचे ३८ वर्षी पोलिस सेवेत देणारे वर्दीतील एक दर्दी व्यक्ती तसेच निष्पक्षपाती न्याय करून देणारे अधिकारी म्हणुन ज्यांची नेहमी सर्वसाधारण व्यक्तीमध्ये ओळख राहीली ज्यांचा अनेक गुन्ह्याचा तपास महाराष्ट्राभर गाजला कायदा-सु-व्यवस्था अबाधीत ठेवणारे अधिकारी म्हणून ज्यांची नेहमी रावेर फैजपुर यावल पट्यात ओळख राहीली ते नरेंद्र पिंगळे आज पोलिस सेवेतुन सेवानिवृत्त होत आहे. 

 

वडील पोलिससेवेत होते म्हणून नरेंद्र पिंगळे १९८३ मध्ये पोलिस शिपाई म्हणून पोलिस प्रशासनात रुजु झाले. शिक्षणाने बिकॉम असलेले श्री पिंगळे १९८७ मध्ये सरळसेवाच्या माध्यमातुन पोलिस उपनिरिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नागपुर,बुलढाणा नाशिक, व्हाया पोलिस निरिक्षक म्हणुन २०१७ मध्ये रावेरमध्ये आले. त्यांच्या रावेर पोलिस स्टेशनच्या कार्यकाळात गुन्ह्यावर प्रचंड अंकुश होता. सर्वसाधारण व्यक्तीला सहज उपलब्ध होणारे पोलिस निरिक्षक म्हणून त्यांची रावेर मध्ये ख्याती होती पोलिस निरिक्षक नरेंद्र पिंगळे यांची २०१८ मध्ये प्रमोशन होऊन उप विभागीय पोलिस अधिकारी म्हणून जात पडताळणी नंदुरबार येथे बदली झाली त्या नंतर फैजपुर येथे उपविभागीय अधिकारी म्हणुन नरेंद्र पिंगळे रुजु झाले नेहमी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रावेर व यावल भागात तत्परतेने काम केले. रावेर दंगल असो की आहीरवाडी दंगल  बोरखेडा हत्याकांड या गुन्ह्यात त्यांनी कमालीचे मार्गदर्शन केले.नासिक येथील विपीन बाफना या युवकाचे खंडणीसाठी अपहरण करून खुन केल्याचा बहुचर्चित गुन्हा त्यांना खुप आठवतो. या गुन्हात तपास अधिकारी म्हणून काम केले यातील सर्व आरोपीना अटक होऊन जेलबंद केल्याचे ते डीवायएसपी नरेंद्र पिंगळे सांगतात.

पोलिस प्रशासनात येथे दिली सेवा 

१९८९ मध्ये रेल्वे नागपुर येथे पोलिस उपनिरिक्षक म्हणून रुजु त्या नंतर १९९३ मध्ये नासिक ग्रामीण २००५ महामार्ग सुरक्षा पथक २००६ बुलढाणा एलसिबी २००८ नासिक शहर २०१८ रावेर त्यानंतर प्रमोशन होऊन फैजपुर येथे मागील अडीच वर्षा पासुन उप विभागीय अधिकारी म्हणुन सेवा देत आहे. नरेंद्र पिंगळे यांनी एकूण ३७ वर्ष १० महीने सेवा दिली आहे.

पोलिस अधिक्षकांनी केला सन्मान

पोलिस प्रशासना बद्दल सर्व-साधारण जनतेत ओळख निर्माण करणारा अधिकारी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रात्र-दिवस न बघणारा अधिकारी यांचा आज जळगाव येथे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सन्मान करून गौरव केला. सावदा निंभोरा फैजपुर येथे देखिल उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे यांचा सन्मान झाला. उद्या पोलिस प्रशासनातील शेवटचा निरोप रावेर पोलिस स्टेशनच्या वतीने देण्यात येणार आहे.

Protected Content