मुंबई । उत्तर भारताप्रमाणे आम्ही द्वेषाचे राजकारण करत नसल्याचे नमूद करत देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. काल फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीवर स्पष्टीकरण देतांना ते बोलत होते.
काल खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपतर्फे ही भेट सामनातील मुलाखतीसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी शिवसेनेतर्फे याबाबत कुणी भाष्य केले नव्हते. या पार्श्वभूमिवर, संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत भूमिका स्पष्ट केली.
याप्रसंगी संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे आमचे शस्त्रू नाहीत. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीनुसार मी त्यांची भेट घेतली. आम्ही उत्तर भारतात जसे द्वेषाचे राजकारण करतात तसे राजकारण करत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमच्या भेटीची माहिती होती. असे स्पष्टीकरण शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले.