वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शिवीगाळ व दमदाटी; फिजिओलॉजी विभागप्रमुखांविरोधात पोलीसात तक्रार

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना त्यांच्या कॅबिनमध्ये फिजीओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.चंद्रकांत डांगे यांनी मद्यधुंद अवस्थेत येवून शिवीगाळ व दमदाटी करून गोंधळ घातल्याचा प्रकार आज सकाळी घडला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या कॅबिनमध्ये फिजीओलॉजी प्रमुख प्रा.डॉ. चंद्रकांत डांगे हे मद्यधुंद अवस्थेत येवून तुम्ही कोण आहात, तोंडाला लावलेले मास्क काढा तसेच शिवीगाळ व दमदाटी करून अधिष्ठाता यांच्या खुर्चीवर येवून बसण्याचा केल्याचा प्रकार आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार घडल्यानंतर अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात येवून डॉ. चंद्रकांत डांगे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्या पथकाने जिल्हा शासकिय महाविद्यालयात जावून डॉ. चंद्रकांत डांगे यांना ताब्यात घेवून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणले.

दरम्यान यापुर्वी २५ मे २०२० मध्ये देखील डॉ. डांगे यांनी जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे तत्कलीन डीन डॉ. भास्करराव खैरे असतांना त्यांनी थेट डीन यांच्या खुर्चीवर बसून मोबाईलवर गाणे ऐकू लागले. याबाबत अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांनी विचारणा केली असता त्यांनी आपण डीन असल्याचे ठासून सांगितले होते. त्यावेळी देखील बराच गोंधळ निर्माण झाला होता. आज पुन्हा तोच प्रकार घडला आहे.

Protected Content