जळगाव प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी केली असल्याने या अनुषंगाने चौकशी होणार असल्याचा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
राज्य मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार या अतिशय महत्वाकांक्षी योजनेतील घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता दिसून येत आहे.
या पार्श्वभूमिवर, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेत अनेक प्रकारच्या त्रुटी असून याची चौकशी करावी अशी मागणी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या अनुषंगाने राज्य सरकारने याची चौकशी लावलेली आहे. यातून खरंच ही योजना यशस्वी झाली की नाही याची माहिती समोर येईलच असे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी केले.