एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कुऱ्हा येथे नेत्र तपासणी शिबिर

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कुऱ्हा काकोडा येथे माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कुऱ्हा, संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगर आणि मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा यांच्या विद्यामानाने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते छत्रपती शिवराय आणि घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी जि. प. सदस्य सुभाष पाटील, माजी प. स. सभापती दशरथ कांडेलकर, सरपंच सुनिता ताई मानकर, डॉ. बि. सी. महाजन, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शिवा भाऊ पाटील,तालुका सरचिटणीस रवींद्र दांडगे,रमेश खंडेलवाल, राजु सेठ खंडेलवाल, रणजित गोयनका,अनंत पाटील,रमेश मालगे ,मनोहर निंबाळकर, डॉ गजानन खिरळकर,दिनेश जैस्वाल,व्हि जे एन टी सेल तालुका अध्यक्ष नितेश राठोड,रविंद्र पाटील,अशोक बोराखडे,छगन राठोड, आशुतोष पाटील,ज्ञानदेव मांडोकार ,संतोष कांडेलकर,जानराव उगले, पोपटराव आमोदे, संजय कांडेलकर, गोपाळ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शिबिरात मोहनराव नारायणा नेत्रालयाचे डॉ अमोल देशमुख, डॉ मारोती देशमाने, डॉ संतोष पवार, डॉ ऋषिकेश पाटील, डॉ बाळकृष्ण वावगे, डॉ रुपेश डबेलकर यांनी रुग्णांची नेत्रतपासणी केली. यावेळी सुमारे 470 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. 

शिबिर यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष गजानन पाटील, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष रुपेश माहुरकर, मयुर साठे, सुशिल भुते, भैय्या कांडेलकर, उद्धव महाजन विवेक पाटील, संतोष पाटील, कान्हा चौधरी, पवन पाटील, राजू बोरसे, अविनाश पहाडे, किरण नेमाडे, शुभम खंडेलवाल, सोनू इरफान मिस्त्री, शंकर मोरे, सूरज गव्हाळे, अतुल ठाकूर, बबलू भिसे ,कमलेश बडूगे, पवन म्हस्के, आशिष हिरोळे, निखिल मालगे, छोटू  गव्हाळे, भैया पवार, गणेश भोलाणकर यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content