तरुणाला मारहाण करून लांबविला महागडा मोबाईल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील रिंगरोड वरून पायी जाणाऱ्या तरुणाला अज्ञात २ जणांनी मारहाण करून त्याच्या हातातील १८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविला असून याप्रकरणी ३० जुन रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय ज्ञानेश्वर राठोड (वय-२२) रा. धोबीवराड ता.जि. जळगाव हा तरुण शहरातील राजेश हॉस्पिटल येथे वास्तव्याला आहे. या ठिकाणी ओठी टेक्निशियन म्हणून कामाला आहे. बुधवारी 29 जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विजय राठोड हा रिंगरोड वरील बडोदा बँकेच्या एटीएम जवळून पायी जात असताना अज्ञात दोन जण दुचाकीवर घेऊन त्यांनी विजयचा रस्ता अडविला व तोंडाला रुमाल बांधून त्याला मारहाण केली. त्याच्या हातातील १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल व एटीएम कार्ड घेऊन पसार झाले. याबाबत विजयने तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुरुवार ३० जून रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

Protected Content