यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भूगोल सप्ताह निमित्त भौगोलिक साहित्य प्रदर्शन भरविण्यात आले होते या प्रदर्शनास महा विद्यालयातील विद्यार्थांनी मोठा सहभाग नोंदविला. यावल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भूगोल विभागामार्फत भौगोलिक साहित्य प्रदर्शन आयोजन करण्यात आले.
त्यात प्लेन टेबल सर्वे व साहित्य, चैन टेबल सर्वे,प्रादेशिक नकाशे, भौगोलिक नकाशे, स्थलदर्शक नकाशे, जीपीएस मॅपिंग, रिमोट सेन्सिंग, GIS तसेच इतर साहित्या विषयी विद्यार्थ्यांना प्रा. नरेंद्र पाटील व प्रा. अर्जुन गाढे यांनी सविस्तर माहिती दिली. प्रदर्शनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नंदकिशोर बोदडे, प्रा.अक्षय सपकाळे, प्रा. संतोष जाधव, प्रा. पी. व्ही. मोरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावल महाविद्यालयात भूगोल सप्ताह निमित्त भौगोलिक साहित्य प्रदर्शन
1 year ago
No Comments