Home Cities धरणगाव धरणगाव जेष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी जाहीर

धरणगाव जेष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी जाहीर


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथे नव्याने स्थापन झालेल्या नवोन्मेश जेष्ठ नागरिक संघाच्या प्राथमिक आढावा बैठकीत संघाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डि. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुढील तीन वर्षांसाठी ही निवड बिनविरोध पार पडली.

या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी ज्येष्ठ आणि अनुभवी प्रा. बी. एन. चौधरी यांची निवड झाली आहे, तर सचिवपदाची जबाबदारी मुकेश विश्वमोहन तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून सौ. अरुणा दिलिपराव पाटील, सहसचिव म्हणून सुधाकर शंकर विसावे आणि कोषाध्यक्ष म्हणून वाय. डी. महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

संघाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. आर. एन. महाजन, सुरेश सिताराम चौधरी, डी. जी. पाटील आणि प्रा. सी. एस. पाटील हे ज्येष्ठ सदस्य मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत. कार्यकारिणी सदस्यांमध्ये जयेश रामलाल भावसार, प्रा. अरुण गुलाबराव शिंदे, नितिनचंद्र रसिकलाल गुजराथी, प्रफुल्ल गुलाबदास जैन, राजेश शिशुपाल डहाळे, दमयंतीताई रघुनाथ पाटील, प्रा. रविंद्र निळकंठ भदाणे, विवेक रत्नाकर लाड, विराग गोपाळ वाजपेयी आणि कांतिलाल उखालाल कुमट यांचा समावेश आहे. या नूतन कार्यकारिणीची नोंद ‘फेसकॉम’च्या धुळे विभागीय आणि मुंबई येथील राज्य संघटनेकडे करण्यात आली आहे.

या निवडीनंतर फेसकॉमचे विभागीय अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य बी. एन. पाटील, जिल्हा समन्वयक एस. बी. महाजन, एरंडोल जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण महाजन, सचिव विनायक कुलकर्णी, सदस्य निंबा बडगुजर, पी. जी. चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवोन्मेश जेष्ठ नागरिक संघ जेष्ठ नागरिकांचे संघटन करणे, त्यांच्यात समन्वय साधणे, आरोग्य विषयक समस्यांवर सामूहिक चर्चा करणे, वाचलेल्या पुस्तकांवर मंथन करणे आणि मनोरंजनात्मक तसेच योगाभ्यास विषयक कार्यक्रमांचे आयोजन यांसारखे विविध उपक्रम राबविणार आहे.


Protected Content

Play sound