जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील जगवानी नगरातील दुकान नंबर ४ शटर उचकावून आत प्रवेश करत दुकानातून १ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे जुने स्क्रॅप्ट कॉपर व वायर असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीतील भारत पेट्रोलीयन रोडवरील जगवानी नगरच्या समोर दुकान नंबर ४ आहे. १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून ते रविवारी २७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे चैनल गेट कट करून आत प्रवेश करत दुकानातून १ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे जुने स्क्रॅप आणि वायर असा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अर्जून जयाजी अवचर वय ५२ रा. सिध्दीविनायक शाळेजवळ, अयोध्या नगर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात सोमवारी २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.