जळगाव प्रतिनिधी । येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा हौशी योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जळगाव उर्वरित (ग्रामीण) योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून ह्या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात आज पार पाडल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, उद्दघाटन जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव मिलिंद दीक्षित, किशोर सूर्यवंशी, सदस्य वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स फेडरेशन, क्रीडा अधिकारी जळगाव रेखा पाटील, डॉ.अनिता पाटील, सचिव जिल्हा हौशी योग असोसिएशन यांच्याहस्ते पार पाडले. यावेळी योग संघटनेच्या सचिव अंतरराष्ट्रीय योग पंच डॉ. अनिता सतीश पाटील, दिगंबर महाजन, नरेंद्र भोई, राष्ट्रीय पंच रुद्राणी देवरे, प्रतिभा सपकाळे, चेतन वाघ- मालेगाव, स्वप्निल चौधरी, वालझडे मॅडम-नासिक इत्यादी उपस्थित होते. वर्षा शर्मा, सुशिल तळवेलकर आदींनी सहकार्य केले. तसेच यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
निकाल पुढीलप्रमाणे :- चौदा वर्षाखालील मुलं आणि मुली :- सुब्रो खानरा- रूस्तमजी इंटरनॅशनल, आशुतोष भोई-म.गा.वि.वरणगाव
, कुमार किशोर पाटील रूस्तमजी इंटरनॅशनल, तुषार बोरसे-ब.गो.शानबाग विद्दयालय, शिवम पाटील-काशिनाथ पलोड, कुमार किशोर पाटील-रिदमीक रूस्तमजी इंटरनॅशनल, लोकेश तेली-आर्टिस्टिक म.गा.वि.वरणगाव आणि रोहिणी पवार काशिनाथ पलोड, तृप्ती जयस्वाल काशिनाथ पलोड, वैभवी साळवे ताप्ती पबलिक भुसावळ, गिनीं रंगलानी-रूस्तमजी इंटरनॅशनल, दिशा चौधरी-ग्लोबल स्कूल अमळनेर, कनक पाटील -रिदमीक-काशिनाथ पलोड, त्रिशाला शिंदे-आर्टिस्टिक काशिनाथ पलोड असे नावे आहेत.
तर 17-वर्षाखालील मुले आणि मुली :- कुंदन मगरे-म.गां.वि.वरणगाव, सागर चौधरी-म.गां.वि.वरणगाव, शाहिद इकबाल खान-.गां.वि.वरणगाव, सचीन जोहरे-म.गां.वि.वरणगाव, चेतन मानकरे-म.गां.वि.वरणगाव, अभिषेक पाटील-रिदमीक-मुंदडा ग्लोबल स्कूल,अमळनेर, भावेश देसले- आर्टिस्टिक-मुंदडा ग्लोबल स्कूल, नेहा भोसले-काशिनाथ पलोड, वैष्णवी पाटील-अमळनेर ग्लोबल
, तनुश्री सोनवणे-अमळनेर ग्लोबल, अंजली झंवर-काशिनाथ पलोड, वसुधा देसले-अमळनेर ग्लोबल, ईशीत परदेशी-रिदमीक-आहिल्या देवी भुसावळ, मानसी पाटील-आर्टिस्टक-अमळनेर ग्लोबल आणि 19 वर्षाखालील मुले :-दुर्गेश मगरे-मं.गा.वि.वरणगाव, तनय खाचने-मं.गा.वि.वरणगाव, गौरव भोई-मं.गा.वि.वरणगाव, गणेश टिंगोरे-मं.गा.वि.वरणगाव, कमलेश माळी-मं.गा.वि.वरणगाव आणि स्नेहा पाटील-प्रताप कौ अमळनेर असे निकाली मुलांचे नावे आहेत.