उपरोधिक सत्कारासाठी उपमहापौरांना घेराव (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । कालपासून उपमहापौर सुनिल खडके यांनी शहरातील प्रत्येक वार्डात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘उपमहापौर आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यानुसार त्यांनी आज वार्ड क्र. २ मध्ये आज दौरा केला असता त्यांचा उपरोधिक सत्कार करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याने गोंधळ उडाला होता.

आज सकाळी उपमहापौर सुनिल खडके यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्यासह शिवाजीनगरमध्ये दौरा केला. भाजपा नगरसेवकांनी वार्ड क्र. २ मध्ये सर्व कामे झाली आहेत व समस्या नाहीत असे सांगितले. मात्र ती कामे झालेली नाहीत असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकारयांनी केला. रस्त्याचे काम झाले आहे असे उपमहापौर यांना सांगण्यात आले परंतु, ते काम बंद पडलेले असल्याचे शिवसेनेतर्फे निदर्शनास आणून देण्यात आले.

मागील चार वर्षाच्या काळात पाठपुरावा केला . आमदार किंवा दुसरे पदाधिकारी यांनी कोणीच लक्ष दिले नाही परंतु प्रथमच उपमहापौर यांनी या वार्डाकडे लक्ष दिल्याने उपमहापौर यांना घेराव घालून पुष्पगुच्छ देऊन नागरिकांतर्फे उपरोधिक सत्कार करण्यात आला. त्यांनी तो सत्कार नाकारल्याचा दावा शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे.

याप्रसंगी शिवाजी नगर शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल, शिवाजी नगरचे अध्यक्ष निशान काटकर, समाजसेवक शकील बागवान, समाजसेवक भगवान सोनवणे, नरेंद्र शिंदे, भरत तुपे, वेदांत जाधव, अल्पसंख्यांक अध्यक्ष अखिल भाई पटेल, संजय चित्ते, दिलीप गायकवाड, दत्तात्रय बांदल, रमेश गवळी व महिला वर्ग, समस्त शिवाजी नगर रहिवासी व मित्रपरिवार उपस्थित होते.

उपमहापौर यांनी टाळली भेट
आपली समस्या उपमहापौरांकडे मांडण्यासाठी शिवाजीनगर हमाल वाडा येथे महिला थांबून होत्या. आज नळास पाणी आलेले असतांना रस्त्याच्या धुळीचा, शिवाजीनगर मधून होणारी वाढती वर्दळीने रस्त्याची झालेली दुरवस्था याबाबत तक्रार करणार होत्या. परंतु, उपमहापौर खडके यांनी चौकात न येताच पुढील भागास भेट दिल्याने या महिलांचा हिरमोड झाला.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/948510825673519/

 

Protected Content