केसीईच्या प.वि.पाटील विद्यालयात नाट्यछटा स्पर्धा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशूराम विठोबा पाटील आणि ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला आहे.

सामान्य माणूस व निसर्ग राजा, पूरग्रस्त व्यक्तीची व्यथा, हिरकणी, कोरोनाचा व्याप चिमुकल्यांना वैताग, कोरोनात गेलेल्या आईच्या मुलीची भावना , छकुलीचा ऑनलाईन अभ्यास , भ्रूण हत्या , एकच प्याला, गावरान गंगु मुंबईला जाते, लोकसंख्या वाढ अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सुंदर अशा नाट्यछटा ऑनलाईन पद्धतीने सादर केल्या. विद्यार्थ्यांकडून सदर नाट्यछटा चे व्हिडिओज व्हाट्सअप ग्रुप द्वारा एकत्रित करून सदर स्पर्धा घेण्यात आली. मुख्याध्यापिका रेखा पाटील तसेच डी. व्ही. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक योगेश भालेराव, सरला पाटील, अतुल पाटील,  चंद्रकांत कोळी, पराग राणे, डी. बी.चौधरी आदींनी स्पर्धेचे नियोजन तसेच परीक्षण केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content