जळगाव – लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी | महानगर पालिका अतिक्रमण विभागाच्या वतीनं आज शहरात ५१ मॅक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या आणि नॉन ओव्हन मटेरीयलच्या पिशव्यांचा साठासंदर्भात तीन विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.
आज गुरुवार, दि. ७ जुलै २०२२ रोजी महानगर पालिका अतिक्रमण विभागाच्या वतीनं पहिली कारवाई ‘मे. दयाल प्रोव्हीजन’चे प्रोप्रायटर प्रा.दयानंद कटारीया यांच्या पांडे चौकातील किराणा दुकानात ५१ मॅक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या साधारण ५० किलो प्लास्टीकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्यांच्याकडून रुपये ५,००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई ‘गो ग्रीन इंडस्ट्रीज’ E 4 – MIDC जळगाव यांच्या कंपनीत प्रतिबंधीत नॉन ओव्हन मटेरीयलच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळला. त्यामुळे सदर कंपनीमधील प्रतिबंधीत मालाचा साठा असलेला भाग सिल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई ‘चामुंडा एन्टरप्राईझेस’ विलास बडगुजर ५५३ / ५४ पाटनादेवी नगर, रामेश्वर कॉलनी, जळगांव येथे प्रतिबंधीत नॉन ओव्हन मटेरीयलच्या पिशव्या तयार करत असल्याचे आढळून आले. साधारणतः १००० किलोपर्यंतचा माल जप्त करून ५००० रु दंड वसूल केला.
हि कारवाई आयुक्त डॉ. विद्या गायकवाड मॅडम व सहा. आयुक्त अभिजीत बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि MPCB चे ताराचंद ठाकरे यांच्या उपस्थीतीत प्लास्टीक बंदी पथक प्रमुख जितेंद्र किरंगे यांनी अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकुर आरोग्य युनिट प्रमुख कुणाल बारसे, विशाल वानखेडे, सुरेश भालेराव आदी. कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आहे.
व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/755239112299423