इच्छादेवी चौकात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। शहरातील इच्छादेवी चौक परिसरात सोमवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता एका अनोळखी अंदाजे 50 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी सायंकाळी 6 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,, जळगाव शहरातील इच्छादेवी चौकातील अंकल ट्रॅव्हल्सच्या ऑफिसच्या बाजूला एक अंदाजे 50 वर्षे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता उघडकीला आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेऊन त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल तायडे यांनी तपासणी केली असता मयत घोषित केले. या प्रकरणे सायंकाळी ६ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरीफ शेख हे करीत आहे.

Protected Content