एका लाखासाठी विवाहितेचा छळ; पोलिसात गुन्हा दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील भवारी येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी खेडगाव येथे १ लाखांची मागणी करत शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी सोमवारी १३ मे रोजी सकाळी ११ वाजता मेहुनबारे पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील भवारी येथील माहेर असलेल्या विद्या राकेश निकम यांचा विवाह भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील राकेश भास्कर निकम यांच्याशी रीतीरीवाजा नुसार झालेला आहे. लग्नाचे काही महिने चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेरहून मोटरसायकल घेण्यासाठी १ लाख रुपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही याचा राग मनात धरत पती राकेश निकम याने विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासू-सासरे यांनी देखील शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी भवारी येथे निघून आल्या. दरम्यान त्यांनी सोमवारी १३ मे रोजी सकाळी ११ वाजता मेहुनबारे पोलिसात अजून तक्रार दिली. त्यानुसार पती राकेश भास्कर निकम, सासू मंगलाबाई भास्कर निकम, सासरे भास्कर पौलाद निकम तिघे रा. खेडगाव ता. भडगाव, ननंद भाग्यश्री भगतसिंग तोरे, नांदोई भगतसिंग तोरे रा. बोदवड यांच्या विरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल पाटील हे करीत आहे.

Protected Content