जिल्ह्यात अवैध दारूच्या अड्ड्यावर उत्पादन शुल्क विभागाचे छापेमारी

जळगाव जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने भुसावळ, मुक्ताईनग, बोदवड, यावल आणि रावेर या तालुक्यांमध्ये छापेमारी करून सुमारे १२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर जिल्ह्यात वेगवेगळे एकुण ४२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशी माहिती अधिक्षीका सीमा झावरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि रावेर तालुक्यात बेकायदेशीररित्या अवैध ढाबे, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री केंद्र, हातभट्टी दारूची वाहतूक आणि बनावट मद्य निर्मिती होत असल्याच्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भुसावळ विभागाने धडक कारवाई केली आहे.

 

यामध्ये ४ हजार २०० लिटर रसायन, ६५३ लिटर गावठी हातभट्टी दारु, १६९ लिटर देशी मद्य, ७२ लिटर विदेशी मद्य, ५५ लिटर बियर, १३१ लिटर बनावट विदेशी मद्य, १ ओमनी कार, ३ असा एकुण १२ लाख २ हजार ९७७ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भुसावळ विभागातील भुसावळ, मुक्ताईन, बोदवड, यावल व रावेर यासह इतर विभागात ही कारवाई सुरूच राहिल अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सीमा झावरे यांनी दिली.

 

ही कारवाई विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, सागर देशमुख, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान विठ्ठल हाटकर, योगेश राठोड यांनी यशस्वी रित्या पार पाडली. या गुन्ह्यांचा तपास निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, दुय्यम निरीक्षक सत्यविजय ठेंगडे हे करीत आहे.

Protected Content