माजी विद्यार्थ्याचा स्तुत्य उपक्रम : शाळेत वाटले शैक्षणिक साहित्य

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील जि.प. शाळेचे माजी विद्यार्थिनी तथा सेवानिवृत्त नायब तहसीलदार जळगाव कमल देवराम सपकाळे वाघ यांनी आपले आई बहिणाबाई आणि वडील देवराम सपकाळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इयत्ता दहावी, बारावी पास अनुसूचित जाती मधील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक मोठे रजिस्टर, पेन, दिवाळी फराळ आणि प्रत्येकी शंभर रुपये भेट देऊन त्यांचा सत्कार केला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, स्केच पेन, चित्रकला वही, वाटर कलर, दिवाळी फराळ आणि प्रत्येकी एक बिस्किट पुडा भेट दिला. तसेच इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या उपस्थित विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक वही, पेन,कंपास, दिवाळी फराळ भेट दिला.

कमल सपकाळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आमच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची होती.माझे वडील गावातील पोलीस पाटील यांच्याकडे मजुरीने कामाला जायचे.आमच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मागायचे.आज आम्ही तिन्ही बहिणी शिक्षण घेऊन नोकरीला लागले. या शाळेचे, शिक्षकांचे आमच्यावर अनंत उपकार आहे. त्याची एक परतफेड म्हणून,आम्ही आज साहित्य वाटप करत आहोत. मुलांनो तुम्ही सुद्धा चांगले शिक्षण घेऊन भारताचे सुजाण नागरिक व्हा.उच्च शिक्षित होऊन विविध पदांवर कार्यरत व्हा. आणि आपल्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे उपकार विसरू नका.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या नवनिर्वाचित सरपंच सुनिता संदीप सपकाळे या अध्यक्षस्थानी होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न समिती संचालक कैलास पाटील, समर्थ नर्सरी संचालक बन्सीलाल पाटील, सामाजिकर्ते दिलीप सपकाळे, कवी तथा साहित्यिक शिक्षक सुभाष मोरे,सोपान सपकाळे, संदीप सपकाळे, राहुल पाटील वंदना जाधव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चारुलता कोल्हे, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी तायडे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक समाधान जाधव सर यांनी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content