प्रत्येकाने आपल्या जन्मदिनी रक्तदान करावे – जनार्दन हरी जी महाराज

फैजपूर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रत्येकाने आपल्या जन्मदिनी रक्तदान करावे. रक्तदात्यांनी सातत्यपूर्ण रक्तदान शिबिर व रक्तदान कार्यक्रम घेतल्यास रक्तपेढीला कायम संजीवनी मिळत राहील. वेळोवेळी नियमाप्रमाणे चेकअप करून रक्तदान केल्यामुळे नवीन रक्त उपलब्ध होते. शरीरात रक्ताचं ब्लड सर्क्युलेशन नियमित होत राहते.

रक्तदात्यांनी नियमित रक्तदान केल्यास निर्विघ्नपणे संजीवनी ब्लड बँक सुरू राहील यासाठी प्रत्येकाने रक्तदान करून जीवनदान देण्याचं काम आजीवन करत रहावे असे महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी सांगितले.

दोन वर्षांमध्ये ज्या रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले अशा रक्त दात्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. परमपूज्य जगन्नाथ महाराज संजीवनी ब्लड बँकेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी दुपारी संत महात्मा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज होते. व्यासपीठावर स्वरूपानंद महाराज डोंगरदे, पवनदास महाराज, धनराज महाराज अंजाळेकर, ललित महाराज माळी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, नरेंद्र नारखेडे, निलेश राणे उपस्थित होते.
धनराज महाराज अंजाळेकर, स्वरूपानंद महाराज, पवन महाराज नरेंद्र नारखेडे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी संजीवनी ब्लड सेंटरचे नितीन इंगळे, कांचन नेहेते, राजेश इंगळे व सर्व विश्वस्त यांनी परिश्रम घेतले.

Protected Content