महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करा : डॉ संभाजीराजे पाटील

पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील राजपूत समाजबांधवांच्या उत्थानासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी डॉ. संभाजीराजे पाटील यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, महाराष्ट्र राज्यातील राजपूत समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास असून शेती किंवा छोटे उद्योग , व्यवसाय करून आपली उपजीविका करीत असतो. दरम्यान, मागील वर्षी संभाजीनगर येथे झालेल्या समस्त राजपूत समाज मेळाव्याप्रसंगी मुख्यमंत्री यांनी या समाजाच्या सहकार्यासाठी महाराणा प्रतापसिह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा देखील केली होती.

या अनुषंगाने सुरू अर्थसंकल्पात महामंडळ स्थापनेचा निर्णय करून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या समस्त राजपूत समाजाला दिलासा द्यावा यासाठी डॉ संभाजीराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन राजपूत समाजाच्या समस्या सविस्तर मांडून आर्थिक महामंडळ लवकर तसेच याच आधिवेशनात व्हावे ही मागणी केली. या महामंडळ मुळे समस्त महाराष्ट्रभरातील राजपूत समाजाला मोठा दिलासा मिळेल. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक अरविंद मानकरी , धरणगाव रांका तालुकाध्यक्ष बाप्पुसाहेब आर आर पाटील आदींची उपस्थिती होती.

या मागणीच्या पाठपुराव्यासाठी जिल्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची डॉ संभाजीराजे पाटील भेट घेण्यात आली यांच्या निवेदनाची दखल घेत शासन लवकरच महामंडळ स्थापने बाबत योग्य पाऊल उचलेल असे आश्वासित करण्यात आले

Protected Content