एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कासोदा येथील गुप्तधनाच्या चोरी प्रकरणात आठ जणांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील कासोदा येथे २१ जानेवारी रोजी स्वातंत्र्य सैनिक स्व. गणपती समदाणी यांच्या पडीत घराच्या भिंतीत गुप्तधन सापडले होते. हे गुप्तधन नियमानुसार शासनाकडे जमा करण्याऐवजी यातील काही भाग हा लंपास करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला मधुकर भागीरथ समदानी (वय ७२), युगल कैलास समदानी (वय २८), जितेंद्र बीरबल यादव (वय २६), ज्ञानेश्वर संतोष मराठे (वय ६०), संजय ऊर्फ सतीश साहेबराव पाटील (वय ३३), राहुल राजू भिल (वय २६), लहू दिलीप पाटील (वय २६), स्वप्निल शांताराम पाटील (वय ३३, सर्व रा. कासोदा) या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल होता.
दरम्यान, या प्रकरणातील वर नमूद केलेल्या सर्व संशयितांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.