एरंडोल येथे ‘म्युकर मायकॉसीस व पोस्ट कोवीड निदान’ वर मार्गदर्शन शिबीर

एरंडोल प्रतिनिधी । शहरातील सुखकर्ता फाऊंडेशन व डॉक्टर असोसिएशनच्यावतीने शहरात ‘म्युकर मायकॉसीस व पोस्ट कोवीड निदान’  या विषयावर मोफत मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.

प्रांताधिकारी विनय गोसावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ फिरोज शेख, एरंडोल डॉक्टर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा, सुखकर्ता फाऊंडेशनचे डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या आवाहनाला खासगी डॉक्टर यांनी लागलीच प्रतिसाद दिला आहे. 

उत्तर महाराष्ट्रात तालुका पातळीवर हा पहिला उपक्रम मोफत राबविण्यात आल्याने नागरीकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.  आजाराविषयी नागरिकांमध्ये असणारी भिती दूर होऊन त्यांना मोफत तपासणी व मार्गदर्शन मिळणार असल्याचे या शिबिराच्या निमित्ताने प्रांताधिकारी विनय गोसावी सांगितले आहे तसेच या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content