Home Cities जळगाव अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त एपीक चित्र प्रदर्शन (व्हिडीओ)

अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त एपीक चित्र प्रदर्शन (व्हिडीओ)

0
37

जळगाव प्रतिनिधी । जैन उद्योग समूहाचे चेअरमन अशोकभाऊ जैन यांच्या ५६ व्या जन्म दिवसानिमित्त आजपासून शहरातील भाऊंच्या उद्यानात एपीक चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १४ फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी ५ ते १० या वेळात सर्वांसाठी खुले राहणार आहे.

जैन उद्योग समूहातील २५ सहकार्‍यांनी वेगवेगळ्या वेळी मोबाईलद्वारे काढलेली आगळी-वेगळी छायाचित्रे उद्यानातील आर्ट गॅलरीतील या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. जैन उद्योग समूहाचे कलावंत विकास मलारा यांच्या संकल्पनेतून अशोकभाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी हे साकारण्यात आले आहे. या प्रदर्शनाला शहरातील नागरिकांनी अवश्य भेट देऊन या कलावंतांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजक विकास मलारा यांनी केले आहे.

पहा– विकास मलारा यांनी एपीक चित्र प्रदर्शनाबद्दल दिलेली माहिती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound