साकेगावात कोरोनाची एंट्री, महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । आजवर कोरोनाचा संसर्ग थोपवून धरलेल्या साकेगावमध्ये या विषाणूने एंट्री केली असून एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून ग्रामपंचायतीने उपाययोजनेला प्रारंभ केला आहे.

भुसावळ तालुक्यातील लहान-मोठ्या गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून येत असले तरी अद्याप साकेगाव येथे या विषाणूची बाधा असणारा एकही रूग्ण आढळून आला नव्हता. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी गावातील महादेव मंदिर परिसरातील एका माहिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. संबंधीत महिलेला डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधीत महिलेचे वास्तव्य असणारा परिसर सील करून या भागात फवारणीची तयारी केली आहे. सरपंच अनिल पुंडलीक पाटील व माजी सरपंच आनंदा ठाकरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी या भागाला भेट देऊन उपाययोजनांची पाहणी केली आहे. दरम्यान, या महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने साकेगावमध्ये कोरोनाची एंट्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या महिलेच्या कुटुंबियांना देखील क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

Protected Content